पुणे : काल मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी बारामतीमध्ये शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान आता स्वतः वसंत मोरे यांनी या भेटीच स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमकं काय घडलं
मंगळवारी बारामती लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती. या बैठकीमध्ये मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे देखील दिसून आले. यामुळे चर्चेला एकच उधाण आले. वसंत मोरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने आता ते शरद पवारांची साथ यापुढे देणार का ? अशी चर्चा होत असतानाच ही भेट केवळ एका निवेदन देण्यासाठी होती हे वसंत मोरे यांनी सांगितल आहे.
या कारणामुळे घेतली होती वसंत मोरे यांनी पवारांची भेट
राजकीय वर्तुळात पवार आणि मोरे यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण आले असताना स्वतः वसंत मोरेंनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ” ही एक सामाजिक भेट होती. कात्रज दूध उत्पादक संघाच्या एका नऊ एकर भूखंडावर मैदानाच आरक्षण आहे. राज्य सरकारमधील एका बड्या मंत्राच्या सहाय्याने हे आरक्षण उठवून भूखंडाचा दुसऱ्या कामासाठी वापर करण्याचा प्रयत्न सुरू असून मैदान हे मैदानच राहावं अशी आपली भूमिका आहे. त्यामुळे तुम्हीही या कामाला विरोध करावा अशा आशयाचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांना देण्यासाठी वसंत मोरे हे त्या ठिकाणी गेले होते. असं त्यांनी स्पष्ट केल आहे.