बारामती : देशभरामध्ये आज लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची Lok Sabha Results Update प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रातील बारामती Baramati लोकसभा मतदार संघाकडे राज्याचाच नाही. तर देशाचा देखील लक्ष लागल आहे. कारण बारामतीमध्ये यंदा केवळ राजकीयच नाही तर कौटुंबिक लढत देखील पाहायला मिळते आहे.
बारामतीमध्ये पहिल्या मतमोजणी टप्प्यामध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे. यंदा महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे बारामतीत सुनबाई विरुद्ध लेक अशी लढत झाली आहे. सध्या तरी बारामतीकरांनी लेकीलाच पसंती दिल्याचं चित्र पाहायला मिळते आहे.
बारामतीमधील सहा विधानसभा मतदार संघामध्ये सुप्रिया सुळे याच आघाडीवर आहेत. पहिल्या मतमोजणी फेरीमध्ये तब्बल 14,000 मतांनी सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे.