बारामती : लोकसभा निवडणुकीच्या Baramati Lok Sabha Election 2024 पार्श्वभूमीवर आता जवळपास सर्वच लढती निश्चित झाल्या आहेत. या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून बारामतीकडे सर्वांचेच लक्ष लागल आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातले 2 मोठे नेते आपला नशीब अजमावणार आहेत. त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार sharad pawar सुप्रिया सुळे Supriya Sule पाठीशी आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आहेत. त्याच बरोबर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून अजित पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती मिळते आहे.
बारामतीतून केवळ राजकीय नाही तर आता पवार विरुद्ध पवार ही प्रतिष्ठेची लढाई लढली जाणार आहे. येत्या 18 एप्रिलला नणंद-भवजई आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे 18 एप्रिल या एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्याचबरोबर या दिवशी मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार असून दोन्हीही युती आणि आघाडीचे प्रमुख नेते या दिवशी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे.
Pune Breaking : भाऊ रंगारी गणपती जवळ वाड्याला भीषण आगीची घटना, फायरब्रिगेडच्या 40 जवानांचे शर्थीचे प्रयत्न, मोठा अनर्थ टळला
येत्या 18 एप्रिलला महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील डमी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळते आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने देखील एक अर्ज खरेदी करण्यात आलेला आहे. त्यामुळे येत्या 18 तारखेला मोठ्या राजकीय हालचाली होत आहेत. त्यामुळे बारामतीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे