Balasaheb Thackeray : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. १७ नोव्हेंबर २०१२ याच दिवशी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झालेत. अभिवादनासाठी सकाळपासूनच शिवाजी पार्कवर रांगा लागल्या आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अभिवादन केलंय. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदनी खास पोस्ट करून बाळासाहेबांविषयीच्या आठवणी जागवल्या आहेत.
काय आहे आदित्य ठाकरेंची पोस्ट?
आजोबा आणि नातू हे नातं जगात सगळ्यात ‘स्पेशल’ असतं…
त्यात आदर असतोच,
पण मैत्री जास्त असते…
धाक असतोच,
पण प्रेम जास्त असतं…
वयाचं अंतर असतंच,
पण मन जवळ असतं….
आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो… त्यापेक्षा घट्ट मित्र दुसरा कोणीही असू शकत नाही!
मी भाग्यवान आहे की, जगासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ असलेला युगपुरूष माझा ‘आज्या’ आहे … बाळासाहेबांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
आणखी वाचा – RBI On Bajaj Finance : बजाज फायनान्सवर RBI ची मोठी कारवाई, कर्ज देण्यावर बंदी
आदित्य ठाकरे यांनी या शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आदित्य ठाकरेंनी आजोबा बाळासाहेब ठाकरेंविषयी केलेली भावनिक पोस्ट चर्चेत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करतानाच बाळासाहेबांच्या विचारांवर जातो आहोत असं म्हटलं. तर उद्धव ठाकरेंनी माझा वारसा मला बाळासाहेबांनीच दिला आहे असं म्हटलं.
शिवाजी पार्कवर विविध कार्यक्रमांचं आयोजन
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्तानं आज शिवाजी पार्कवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहेत. त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर शिवाजी पार्क स्मृतीस्थळ सज्ज झालंय. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी अभिवादनासाठी येणार आहेत. यामुळे शिवाजी पार्कवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.