मुंबई : शुक्रवारपासून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे Ambadas Danave हे भाजपमध्ये BJP प्रवेश करणार अशा चर्चांना ऊत आला आहे. यावर आता अंबादास दानवे यांनी स्वतःच माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी माध्यमांवर देखील रोष व्यक्त केला आहे.
नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे
अंबादास दानवे यांनी शनिवारी थेट पत्रकार परिषद घेऊनच या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ” माझ्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठवण्यात आलेल्या आहेत. मी निष्ठावान शिवसैनिक आहे. माझ्या तीस वर्षाच्या निष्ठेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या दिवशी खैरेंची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी नाराजी असू शकते, रोज रोज नाराजी नसते. ” असं ते म्हणाले.
तसेच ” शिवसेना भाजपचे विचार जुळतात, कारण 25 वर्ष आम्ही एकत्रित काम केलेल आहे. परंतु शिवसेनेचा वेगळा बाणा आहे. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी मी काम करणार आहे. ” असे थेट स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी देऊन या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.
Baramati : देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर; ‘ या ‘ अटीवर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन
शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक नेते हे त्यांच्याबरोबर आले. तर आजही अनेक निष्ठावान नेते हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंबादास दानवे हे आहेत. तीस वर्ष ते शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसोबत काम करत आहेत. दरम्यान शुक्रवारपासून अंबादास दानवे हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या सातत्याने माध्यमांमध्ये झळकत होत्या. त्यावरून आज अंबादास दानवे यांनी काही प्रमाणात माध्यमांवर देखील रोष व्यक्त करून असे काहीही होणार नाही असेच स्पष्ट केले आहे.