मुंबई : अखेर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आरक्षण न घेता परत जाण्याचा केलेला निर्धार यशस्वी होताना दिसतो आहे. शुक्रवारी रात्री उशिरा राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली होती. आणि आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य असल्याचे राज्य सरकारने घोषित केले आहे.

दरम्यान यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक सडेतोड प्रश्न आणि सल्ला मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे फक्त एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा असं ते म्हणाले आहेत. एका अर्थाने हा राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलेला सल्ला असला तरी सवाल मात्र राज्य सरकारला त्यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लिहिले आहे कि ,”श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !
MARATHA RESERVATION : ” मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेल्या अध्यादेशाची आम्ही होळी करू..! ” ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची संतप्त प्रतिक्रिया