मुंबई : अमोल कीर्तीकर Amol Kirtikar यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले आहेत. येत्या 8 एप्रिलला कीर्तिकर यांना चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहेत. या आधी देखील अमोल कीर्तीकर यांना समन्स बजावण्यात आले होते. परंतु चौकशीसाठी अमोल कीर्तीकर हे हजर झाले नव्हते.
काय आहे नेमकं प्रकरण
कथित खिचडी घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये काही दिवसांपूर्वीच युवा सेनेचे पदाधिकारी सुरज चव्हाण यांना इडीने अटक केली होती. या प्रकरणांमध्ये अमोल कीर्तिकर यांचे देखील नाव आढळून आले होते. त्यानुसार त्यांना या आधीही समन्स बजावला होता. परंतु अत्यंत शॉर्ट नोटीसवर हा समन्स देण्यात आला असून कीर्तीकर यांना दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रमासाठी हजर राहणे आवश्यक असल्याचे कारण देऊन कीर्तीकरांनी या चौकशीसाठी मुदतवाढ मागितली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. त्यानुसार त्यांना आठ एप्रिलला हजर व्हावे लागणार आहे.
कोण आहेत अमोल कीर्तीकर

- अमोल कीर्तीकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आहेत.
- येत्या लोकसभा निवडणुकीसाठी ते वायव्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत.
एकंदरीतच ईडीने सुरज चव्हाण यांच्यानंतर आता आपला मोर्चा हा अमोल कीर्तिकर यांच्याकडे वळवल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.