पुणे : अहमदनगर पारनेरचे आमदार निलेश लंके यांचं नाव सध्या राजकीय वर्तुळात चांगलंच गाजतंय. निलेश लंके हे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झालं असताना अजित पवारांनी AJIT PAWAR निलेश लंकेची एकीकडे चांगलीच कान उघाडणी केली आहे.
निलेश लंके हे यंदा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जबरदस्त इच्छुक आहेत. तर कालच भाजपने आपली लोकसभा उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांना देण्यात आली आहे. खरंतर ही उमेदवारी सुजय विखे पाटील यांना दिली जाणार हे देखील जवळपास निश्चित होतं. त्यावरूनच आता पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. अर्थातच शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी दिली जावी अशी त्यांची अपेक्षा असल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे. सध्या निलेश लंके हे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयात उपस्थित आहेत. शहर कार्यालयाच्या एकंदरीत सुशोभीकरणावरून आणि एकंदरीत राजकीय हालचालींवरून आज निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असं निश्चित मानलं जात आहे.
दरम्यान याबाबत अजित पवार यांनी निलेश लंके यांना खडे बोल सुनावले आहेत अजित पवार म्हणाले की, मी त्याला नीट समजावून काही गोष्टी सांगितल्या आहेत. पण त्याच्या डोक्यात काही लोकांनी एक हवा घातली आहे की, तू खासदार होशील. वास्तविक तसं नाहीय. निलेश पारनेरपुरता लोकप्रिय म्हणून काम करु शकतो. पण बाकी मतदारसंघामध्ये तो समजतो तेवढं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं. आता शेवटी समजावून सांगयाची जेवढी गरज होती, तेवढं मी केलं होतं” असे अजित पवार म्हणाले आहे.
यावर आता निलेश लंके नेमकी काय भूमिका घेतात आणि त्यांची प्रतिक्रिया काय असेल ते काही वेळातच स्पष्ट होईल