बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी Lok Sabha Elections बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. हि आता प्रतिष्ठेपेक्षा आत्मसन्मानाची लढत होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये ननंद विरुद्ध भावजयी म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे.
धक्कादायक म्हणजे या लढतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांची त्यांच्या संपूर्ण कुटुंबांन साथ सोडली आहे. आमदार रोहित पवार, बहिणी सई पवार आणि सुनंदा पवार, रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांच्यासह आता योगेंद्र पवार आणि अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी देखील अजित पवारांच्या विरोधात प्रचाराला उभे राहणार असल्याचं स्पष्ट केल आहे. त्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार ही लढत केवळ राजकीय नाही तर आता कौटुंबिक देखील झाले आहे.
https://www.facebook.com/share/v/7iiGt5m594TenDEf/?mibextid=qi2Omg
अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याचे ठरवले आहे. यावेळी बारामतीतील काटेवाडी भागामध्ये उपस्थित नागरिकांशी संवाद साधत असताना त्यांनी थेट सख्ख्या भावावर म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट शब्दात टीका केली आहे. ते म्हणाले की, याच्यासारखा नालायक माणूस नाही. अशा शब्दात श्रीनिवास पवार यांनी भावाला फटकारल असून ते आता सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे एकंदरीतच अजित पवार हे आता कौटुंबिक चक्रव्यूहात तरी एकटे पडले आहे.