अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते पदाधिकारी आपल्या उमेदवारासाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. नुकतीच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे Amol Kolhe यांनी अहमदनगरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी अहमदनगरमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुतीचे भाजपच्या वतीने लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुजय विखे यांच्यावर मोजक्या शब्दात जहरी टीका केली आहे.
नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ माळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत उपस्थितांना संबोधित करताना सुजय विखे म्हणाले की, ” भाषा येत नाही म्हणून कोणी टीका करत असेल तर मिरवणारी डिग्री ही मेरीटची की पेमेंट सिटची हा निकष लावायचा का? एकीकडे पाच पिढयांचे राजकारण असताना एका सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा उभा रहतो. विचारावर विश्वास ठेऊन लोकशाही टिकविण्यासाठी थेट आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार होतो. हे महत्वाचे आहे. जेंव्हा योध्दा शस्त्र टाकत नाही, शरण येत नाही तेंव्हा तो घेरला जातो. तेंव्हा त्याला बदनाम केले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही लढण्याची उमेद ठेवता ही महत्वाची गोष्ट आहे.” अशा शब्दात त्यांनी निलेश लंके यांचे कौतुक केले आहे.
संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर 800 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा घणाघाती आरोप; ” स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा” राऊतांची कडवट भाषेत टीका
यावेळी डॉ. कोल्हे यांनी त्यांच्यावर झालेल्या टीकेला देखील प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले कि, ” खरे तर नगर दक्षिणमध्ये माझ्यावर टीका करण्याचे कारण नाही. तरीही टीका केली की अमोल कोल्हे घोडयावर दिसले, संसदेत घोडयावर दिसले, महानाटयात घोडयावर दिसले. घोडयावर बसल्यावर तुम्हाल एवढा त्रास होतो. तुम्ही थट्टा करता. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्माला आलो. आम्हाला कष्ट करावे लागतात. तेंव्हा आमच्या घरातली चुल पेटते यात आमचा दोष काय ? आमच्या पाच, पाच पिढया राजकारणात नाहीत. मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता त्यावेळी रात्र रात्र अभ्यास करावा लागला. ९७.३३ टक्के मार्क मिळवावे लागले. आम्हाला कोणी पेमेंटची सिट खैरातमध्ये वाटली नाही. पदव्युतर शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागली. तुमच्या सारखे पेमेंट सिटमधून सरळ नाही. कोणी आम्हाला सिट दिली नाही. जे केवळ मोठया घरात जन्म घेतल्याचं समाधान मिळते त्यावरून तुम्ही टीका करत असाल तर त्याचे आम्हाला वाईट वाटत नाही. कारण ऐंशी टक्के जनता आमच्या सारखी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आणि हिमतीवर जगत असते असे डॉ. कोल्हे यांनी डॉ. विखे यांना सुनावले आहे.