मुंबई : लोकसभा निवडणुकी आधी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपल्या ट्विटर अकाउंट वरून मिलिंद देवरा यांनी ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा नाराज होते. त्यांच्या राजीनाम्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून आधीच व्यक्त केला जात होता.
55 वर्षे देवरा कुटुंब आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. आज मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती आहे.
मिलिंद देवरा कोण आहेत ?
मिलिंद देवरा हे काँग्रेसचे मुंबईतील बडे नेते आहेत. दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. त्यांनी 2004 आणि 2009 ची लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात देवरा हे राज्यमंत्री होते. 2014 आणि 2019 मात्र मिलिंद देवरा यांचा पराभव झाला. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांना पराभूत केलं.