बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील आजची मतदान प्रक्रिया ही सगळ्यात वादळी ठरली आहे. आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान सुरुवातीला सुप्रिया सुळे यांनी थेट अजित पवारांच्या बंगल्यावर धाव घेतली. तर अजित पवार म्हणाले की, मेरे पास मा है ! डायलॉग बाजी आणि आश्चर्यकारक भेटीगाठी नंतर आश्चर्यकारक ईव्हीएम EVM पूजा देखील खडकवासला परिसरात घडली आहे.
बर ईव्हीएमची पूजा करणार्या या सामान्य कुणी नसून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या आहेत. आज त्या मतदान करण्यासाठी खडकवासलामध्ये मतदान केंद्रात दाखल झाल्या. यावेळी त्यांच्या हातामध्ये पूजेचे ताट होते. ज्यात अगदी दिवा देखील लावलेला होता. त्या अचानक पुढे सरकल्या आणि ईव्हीएमची त्यांनी पूजा केली हा सगळा प्रकार निवडणूक अधिकाऱ्यांनी पाहिला आणि एकंदरीतच असा कोणताही प्रकार हा नियमात बसत नसल्या कारणाने त्यांच्यावर तक्रार देखील दाखल झाली आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या या कृतीमुळे महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आता चर्चा होत आहे.
Latur Lok Sabha Election : लातूरमध्ये सुनेगाव सांगवी गावात मतदानचं झाले नाही; मतदारांनी ‘या’ कारणाने टाकला बहिष्कार