नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस कडून जाहीरनामा Congress Manifesto प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने देशाच्या प्रमुख गरजांवर बोट ठेवले आहे यात शंका नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन हा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय.
काँग्रेसने आज प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी, आरक्षण,जीएसटी अशा प्रमुख मुद्द्यांवर देशाला विकासाचे-बदलांचे आश्वासन दिले आहे. या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे…
- बेरोजगारांना उपलब्ध होणार 30 लाख नोकऱ्या
- युवा केंद्र नियोजनाच्या माध्यमातून पहिल्या पक्क्या नोकरीच वचन आणि युवा स्टार्ट फंड रुपये पाच हजार कोटी
- बेरोजगार भत्ता सारख्या योजनांमध्ये थेट खात्यात पैसे
- शैक्षणिक कर्जावर व्याजदर सवलत मिळणार
- अग्निवीर योजना बंद करून जुनी भरती योजना सुरू करणार
- पेपर फुटीवर नियम बनवून कठोर शिक्षा दिली जाणार
- गृहलक्ष्मी योजनेपेक्षा अधिक पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा होणार
- 450 रुपयांना गॅस सिलेंडर मिळणार
- बस प्रवासात सवलत
- शेतकऱ्यांना एमएसपी हमी देणार
- शेतकऱ्यांच्या उपकरणांवरून जीएसटी पूर्णतः संपवण्याचे किंवा कमी करण्याचे आश्वासन
- पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणार
- जात जनगणना आणि त्याच्या संख्येवर आरक्षण मिळणार आरक्षणावरील 50% मर्यादा हटवणार
- न्याय योजनेच्या धरतीवर गरीब मजुरांसाठी आकर्षक योजना आणणार
- पुरेसा अंदाजपत्रक देऊन मनरेगाची पुन्हा अंमलबजावणी करणार
- रेल्वे भाड्यामध्ये घट करणार, तसेच रेल्वेचे खाजगीकरण होऊ देणार नाही
- लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज देणार काही प्रमाणात माफ करून परवडणाऱ्या दरात कर्ज देण्याचे देखील आश्वासन
- केंद्र सरकारच्या नव्या नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण
- नोकरी करणाऱ्या महिलांसाठी डबल हॉस्टेल
काँग्रेसच्या वतीने आठ कोटी हमी कार्ड वितरित करण्यासाठी 3 एप्रिल पासून घरोघरी जाऊन हमी अभियान सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली तसेच राहुल गांधी यांनी वायनाड येथून या मोहिमेची सुरुवात केली आहे. दरम्यान देशातील महागाई पासून नागरिकांची सुटका करण्यासाठी पावले उचलली जातील असं आश्वासन या जाहीरनामाच्या माध्यमातून काँग्रेसने दिले आहे.