Uttarkashi Tunnel Rescue Update : उत्तरकाशी Uttarkashi बोगदा दुर्घटनेला Accident 17 व्या दिवशी मोठं यश मिळालं आहे. अखेर बोगद्यात अडकलेल्या Tunnel Rescue ४१ मजुरांना बाहेर काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मंगळवारी या मजुरांना बोगद्यातुन बाहेर काढण्याचा प्रयत्न्न यश येताना दिसते आहेत. बोगद्यातून मजुरांना बाहेर काढण्यासाठी स्केप बोगदा तयार करण्यात आला आहे.
चारधाम ऑलवेदर प्रकल्पाच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांचे प्राण वाचवण्यासाठी उत्तरकाशी बोगदा बचाव मोहिमेला आज यश आले. उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेला १७ व्या दिवशी मोठे यश मिळाले आहे. अखेर बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंगळवारी बोगद्यात यश आले असून स्केप बोगद्यातून कामगारांना बाहेर काढण्यात येत आहे.
चिन्यालीसोर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात ४१ खाटांचे रुग्णालय तयार आहे. रुग्णवाहिकेतून कामगारांना येथे नेण्यात येणार आहे. रुग्णालयातील डॉक्टरही अलर्ट मोडमध्ये आहेत.सर्वप्रथम बोगद्याच्या आत कामगारांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. प्रत्यक्षात ज्या बोगद्यात कामगार अडकले होते, त्या बोगद्याच्या आतील तापमान ३० ते ३५ अंशांच्या आसपास आहे, तर बोगद्याबाहेरील सिल्क्याराचे सध्याचे तापमान १० अंशांच्या आसपास आहे. १७ दिवसांपासून कामगार ३० ते ३५ अंश तापमानात असल्याने त्यांना तात्काळ १० अंश तापमानात बाहेर आणले जाणार नाही.