UN Report On Poverty : तुम्हाला माहितीये का ‘भारताच्या गरिबीत लक्षणीय घट झालीये. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, 15 वर्षांच्या कालावधीत म्हणजेच (2005-21) मध्ये 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर (UN Report On Poverty) आले. संयुक्त राष्ट्रांनी मंगळवारी सांगितलं की, भारतासह 25 देशांनी 15 वर्षात त्यांचे Global Multidimensional Poverty Index यशस्वीरित्या निम्मे केले. यामध्ये कंबोडिया, चीन, भारत, इंडोनेशिया, मोरोक्को, सर्बिया आणि व्हिएतनाम आणि इतर देशांचा समावेश आहे. गरिबी कमी करण्यात यश मिळविलेल्या देशांच्या यादीत 17 देश आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार 142.86 कोटी लोकसंख्येसह चीनला मागे टाकून भारत एप्रिलमध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला.
एप्रिल 2023 मध्ये भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला
संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2023 मध्ये, भारत 142.86 कोटी लोकसंख्येसह चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला. अहवालात म्हटलं आहे की, ‘विशेषतः भारताने गरिबीत लक्षणीय घट दर्शवली आहे. 2005-2006 मध्ये भारतात गरिबांची लोकसंख्या 55.1 टक्के होती, ती 2019-2021 मध्ये 16.4 टक्क्यांवर आली.
गरिबांमध्ये स्वयंपाकाच्या इंधनाची वाढती उपलब्धता
अहवालानुसार, भारतात स्वयंपाकाच्या इंधनापासून वंचित राहिलेल्या गरिबांची संख्या 52.9 टक्क्यांवरून 13.9 टक्क्यांवर आलीये. दुसरीकडे, 2005-2006 मध्ये 50.4 टक्के लोक स्वच्छतेपासून वंचित होते, त्यांची संख्या 2019-2021 मध्ये 11.3 टक्क्यांवर आलीये. पिण्याच्या पाण्याच्या प्रमाणाबद्दल बोलायचे तर, या कालावधीत बहुआयामी गरीब आणि वंचित लोकांची टक्केवारी 16.4 वरून 2.7 वर आलीये. विजेशिवाय राहणाऱ्या लोकांची संख्या 29 टक्क्यांवरून 2.1 टक्क्यांवर आली आणि घर नसलेल्या गरीबांची संख्या 44.9 टक्क्यांवरून 13.6 टक्क्यांवर आली.
पोषण आणि बालमृत्यूच्या आकडेवारीतही सुधारणा
2005-2006 मध्ये, सुमारे 64.5 कोटी लोकांचा भारतातील दारिद्र्य यादीत समावेश करण्यात आला होता, 2015-2016 मध्ये ही संख्या सुमारे 37 कोटी आणि 2019-2021 मध्ये 23 कोटी इतकी कमी झाली. अहवालानुसार, भारताने सर्वात वेगाने प्रगती केली आहे. भारतातील पोषण निर्देशकांखाली बहुआयामी गरीब आणि वंचित लोकांची संख्या 2005-2006 मधील 44.3 टक्क्यांवरून 2019-2021 मध्ये 11.8 टक्क्यांवर आलीये. या काळात बालमृत्यूचे प्रमाण 4.5 टक्क्यांवरून 1.5 टक्क्यांवर आले.
UN Report On Poverty, भारतातील गरिबी घटली, जागतिक बहुआयामी गरीबी निर्देशांक, Global Multidimensional Poverty Index, Poverty Index, Marathi news, mahatalks