पाकिस्तान : जागतिक बँकेने पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीबाबत इशारा दिला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पाकिस्तानातील गरिबी वाढून ३९.४ टक्क्यांवर पोहोचली असून १ कोटी २० लाखांहून अधिक लोकांना आर्थिक परिस्थितीचा फटका बसला आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, वर्षभरात पाकिस्तानातील गरिबी ३४.२ टक्क्यांवरून ३९.४ टक्क्यांवर पोहोचली असून एक कोटी २० लाखांहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानात सुमारे ९.५ कोटी लोक गरिबीत जगतात.
जागतिक बँकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानचे आर्थिक मॉडेल आता गरिबी कमी करण्यास सक्षम नाही आणि जीवनमान सहकाऱ्यांच्या तुलनेत खाली घसरले आहे. आर्थिक सुरक्षा मिळविण्यासाठी पाकिस्तानने तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन जागतिक बँकेने केले आहे, असे तोबियास हक यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत जागतिक बँक खूप चिंतेत आहे. पाकिस्तानसमोर आर्थिक आणि मानवी विकासाचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. पाकिस्तानमधील जागतिक बँकेचे संचालक नेजी बेनहसीन यांनी सांगितले की, पाकिस्तानसाठी धोरणात्मक बदल करण्याची ही वेळ असू शकते.