मुंबई : महिलांची सर्वात मोठी भरती करणारी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या TCS कंपनीचं WFH संपलं. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्यामध्ये वाढ झाल्याचं टीसीएस विभागाचे प्रमुख मिलिंद लक्कड यांनी सांगितलयं. संघटनात्मक संस्कृती वाढवण्यासाठी कर्मचार्यांना अलीकडे कार्यालयातून पुन्हा काम सुरू करण्यास प्रवृत्त करणाऱ्या TCS ने सांगितलं की, ते लिंगभेद करत नाही.
TCS मध्ये महिलांची संख्या ३५ टक्के
सर्वात मोठी टेक कंपनी TCS ने मंगळवारी सांगितलं की, त्यांच्या महिला कर्मचार्यांमध्ये पुरुषांप्रमाणेच राजीनाम्याचे प्रमाण वाढले. WFH न देण्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येतयं. TCS कंपनीमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. नोकऱ्यांमध्ये कंपनी पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त प्राधान्य देते. TCS च्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये महिलांची संख्या ३५ टक्के आहे.
TCS च्या कर्मचारांपैकी 38.1 टक्के महिला
लक्कड म्हणाले की, ‘iExcel’ सारखे केंद्रित नेतृत्व विकास कार्यक्रम या आघाडीवर बदल घडवून आणतायेत. वार्षिक अहवालात म्हटलं आहे की, महिलांसाठी प्रमुख कार्यकारी नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या 22 आवृत्त्या पूर्ण झाल्या आहेत आणि 1,450 महिला नेत्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. FY23 मध्ये अंतर्गत उमेदवारांसह पूर्ण झालेल्या नेतृत्वाच्या पदांपैकी जवळजवळ चतुर्थांश महिला आहेत. FY23 मध्ये TCS च्या कर्मचारांपैकी 38.1 टक्के महिला होत्या.
FY23 मध्ये जवळपास 14,000 नोकरीचे अर्ज
FY23 मध्ये जवळपास 14,000 नोकरीचे अर्ज आले आहेत, असे वार्षिक अहवालात म्हटले आहे. वरिष्ठ व्यवस्थापन म्हणून वर्गीकृत केलेल्या जवळपास 30,000 कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 4,000 किंवा 13 टक्के महिला होत्या, असे वार्षिक अहवालात म्हटले आहे. त्यात असही म्हटलं आहे की, TCS ने फ्लेक्सीबल कामाच्या व्यवस्थेवर एक धोरण आणले आहे, जे लहान मुलांची काळजी घेणारे, गर्भवती महिला कर्मचारी आणि अपंग व्यक्तींना आवश्यक समर्थन आणि फ्लेक्सीबिलिटी प्रदान करते.