Saudi Arabia Foreign Work Visa: जगात अनेक लोकं नोकरीत असलेल्या संधी निमित्तानं परदेशात जात असतात. अमेरिका, ब्रिटन आणि सौदी अरेबिया (Saudi Arabia) सारख्या देशांकडे वळणाऱ्यांचा आकडा तुलनेनं मोठा आहे. ही बातमी जे परदेशात काम करत आहे त्यांचासाठी महत्तवाची तर आहेच पण जे परदेशात जायायच्या विचारात आहे त्यांचासाठी देखील महत्त्वाची आहे. (Saudi Arabia Foreign Work Visa rule will impact on indians)
नुकतंच सौदी अरेबियानं व्हिसामध्ये काही बदल केले आहेत. पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये इथं नोकरीच्या निमित्तानं येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या दृष्टीनं हे नियम आखण्यात आले आहेत. सौदी अरेबियातील मानव संसाधन आणि सामाजिक विकास मंत्रालयाच्या वतीनं हे नियम जारी करण्यात आले असून, त्यानुसार 2024 या वर्षापासून 24 वर्षांहून कमी वयाचा नागरिक कोणत्याही घरगुती मदतीसाठी कोणत्याही परदेशी नागरिकाला/ कामगाराला कामावर ठेवू शकत नाही.
वरील नियमानुसार सौदीचे नागरिक, सौदी अरेबियाकील पुरुषांच्या परदेशी पत्नी, त्यांची आई, सौदीचं प्रीमियम परमिट असणाऱ्या परदेशी घरगुती मदतनीसांच्या व्हिसासाठी अर्ज करू शकतात. स्थानिक श्रम क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला होता. ज्यामुळं मुसनेड प्लेटफॉर्म एसटीसी पे आणि उरपे अॅप यांसारख्या डिजिटल सॅलरी ट्रान्सफरची प्रक्रिया सोपी होती.
नियमाचा भारतीयांवर काय परिणाम?
उपलब्ध माहितीनुसार सौदी अरेबियामध्ये घरगुती कामांसाठी वाहन चालक, आचारी, सुरक्षा रक्षक, माळी, नर्स, शिवणकाम करणारे आणि घरातील कामांमध्ये मदत करणारे अशा विविध पदांसाठी गरजवंतांना नोकरी दिली जाते. सध्याच्या घडीला सौदीमध्ये 26 लाख भारतीय कामाच्या निमित्तानं वास्तव्यास आहेत. येत्या काळात मात्र या नव्या नियमामुळं हा आकडा मोठ्या फरकानं कमी होऊ शकतो.
व्हिसासाठीच्या अटी
सौदी अरेबियानं व्हिसासाठी आखलेल्या नियमांमध्ये काही आर्थिक बाबींवरही लक्ष टाकण्यात आलं आहे. ज्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा व्हिसा दिला जातो तेव्हा तुम्हाला वेतनाची माहिती द्यावी लागते. ज्यामध्ये फर्स्ट व्हिसा जारी करण्यासाठी बँकेत 40000 सौदी रियाल असणं गरजेचं असतं. सेकंड व्हिसासाठी किमान वेतन 7000 सौदी रियाल असावं आणि बँकेत 60000 सौदी रियाल इतकी रक्कम असावी. थर्ड व्हिसासाठी किमान वेतन 25000 सौदी रियाल आणि बँकेत 200000 सौदी रियाल इतकी रक्कम असणं बंधनकारक आहे. इतकंच नव्हे, तर आता सौदीमध्ये वर्क व्हिसाचा कालावधी दोन वर्षांहून कमी करत परदेशी नागरिकांसाठी तो एका वर्षावर आणण्यात आला आहे. त्यामुळं या बदलांची नोंद करण्याचं आवाहन यंत्रणा करत आहेत.