मुंबई : आज एका खास कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi हे मुंबईत दाखल झाले आहेत. रिझर्व बँकेला RBI आज 90 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्वद रुपयांचं विशेष गाणं जारी करण्यात आला आहे.
कसं आहे हे गाणं

- 90 रुपयांचं नाणं हे पूर्णपणे चांदीचे बनवण्यात आले आहे.
- यात 40 ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आला आहे. 99.9% शुद्ध चांदी पासून हे नाणं बनवण्यात आले.
- या नाण्यावर एका बाजूला आरबीआयचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला 90 रुपये असं लिहिल आहे.
- त्याचबरोबर नाण्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये तर डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत असं लिहिला आहे.
- तसेच वरच्या बाजूला हिंदीमध्ये आणि नाण्याच्या खालच्या बाजूला इंग्रजीमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया असं लिहिला आहे.
- हे नाणं भारत सरकारच्या टांकसाळीत बनवण्यात आल आहे.
- या नाण्याचे एकूण वजन हे 40 ग्रॅम आहे.
- या नाण्याची अंदाजे किंमत 5200 ते 5500 असू शकते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरबीआयच्या 90 वर्षांच्या कार्यकाळाबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, ” देशाची बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आरबीआयची भूमिका महत्त्वाची आणि मोठी आहे. आरबीआयच्या कामाचा थेट परिणाम देशातील सामान्य लोकांच्या व्यवस्थेवर होतो. शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या लोकांपर्यंत आर्थिक समावेशनाचे फायदे पोहोचवण्यात आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.