• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, June 23, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home देश-विदेश

भारत जगातील तिसरी महाशक्ती होईल; भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे प्रतिपादन

Web Team by Web Team
November 8, 2023
in देश-विदेश
0
भारत जगातील तिसरी महाशक्ती होईल; भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे प्रतिपादन
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : भारतातील 1.40 अब्ज लोकांमध्ये ‘आपण साध्य करु शकतो’ हा विश्वास जागृत झाला असून पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता असलेला भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महाशक्ती होईल, असा विश्वास भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांनी आज येथे व्यक्त केला.

राज्यपाल रमेश बैस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वागत केले, त्यावेळी ते बोलत होते. मित्सुबिशी कंपनीच्या अध्यक्षांशी आपली भेट झाली असताना त्यांनी तीन गोष्टींना आपण प्राधान्य देत असल्याचे आपणांस सांगितले. कृत्रिम प्रज्ञा, पर्यावरण समाज सुशासन व भारत हा आपला प्राधान्यक्रम असल्याची आठवण राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांनी राज्यपालांना सांगितली. भारत हा आपला सख्खा शेजारी व घनिष्ठ मित्र आहे असे सांगताना अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले.

Related posts

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

May 29, 2024
#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

May 29, 2024

‘थ्री इडियट’ चित्रपटात लडाखचे चित्रण दाखवल्यानंतर तेथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अनेक पटीने वाढल्याचे नमूद करून भूतानमध्ये चांगल्या चित्रपटांचे चित्रीकरण झाल्यास आपणास आनंदच होईल, कारण त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल, असे त्यांनी सांगितले. भूतानमध्ये मुलीच्या जन्माला फार महत्त्व दिले जाते. आपणांस दोन मुलांनंतर कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे आपण लवकरच आपल्या तिन्ही मुलांना कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पुन्हा येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भूतान नरेशांनी आपल्यासोबत आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची राज्यपाल व उपमुख्यमंत्री यांना ओळख करून दिली.

भूतान नरेशांचे महाराष्ट्रात स्वागत करताना राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन असून भूतान आणि महाराष्ट्र यांच्यातील व्यापार सहकार्य अधिक वृद्धिंगत व्हावे. भूतानमधून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रात आणि विशेषतः पुणे येथे येतात. भूतान आणि महाराष्ट्र यांच्यातील शैक्षणिक देवाणघेवाण अधिक वाढावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र आणि भूतान यांच्यातील संबंधांचे मूळ इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक जनसंपर्क यामध्ये आहे. कान्हेरी, अजिंठा आणि एलोरा लेणी ही भूतानच्या पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय ठिकाणे असल्याचे राज्यपालांनी स्वागत भाषणात सांगितले. भूतानचा सांस्कृतिक महोत्सव मुंबईत आयोजित केला जावा व तसेच महाराष्ट्राचा सांस्कृतिक महोत्सव देखील भूतानमध्ये आयोजित केला जावा अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

औपचारिक भेटीनंतर राज्यपालांनी भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचे आयोजन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, नेमबाज अंजली भागवत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेते प्रशांत दामले, उद्योगपती प्रकाश हिंदुजा, उद्योजक अजय पिरामल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

Previous Post

विजयस्तंभ अभिवादन सोहळा सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन यशस्वी करावा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Next Post

पदवी अभ्यासक्रमात पुढील वर्षीपासून होणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी

Next Post
पदवी अभ्यासक्रमात पुढील वर्षीपासून होणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी

पदवी अभ्यासक्रमात पुढील वर्षीपासून होणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

” असा हा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला आणि आमच्यावर फणा काढून गेला…! ” उद्धव ठाकरेंची अमित शहांवर कडू भाषेत टीका

” असा हा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला आणि आमच्यावर फणा काढून गेला…! ” उद्धव ठाकरेंची अमित शहांवर कडू भाषेत टीका

1 year ago
MAHARASHTRA POLITICS : छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर ? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात गदारोळ

MAHARASHTRA POLITICS : छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर ? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात गदारोळ

1 year ago
BOLLYWOOD NEWS : सलमान खानच्या ‘या’ आवडत्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो सोशल मिडीयावर होत आहेत व्हायरल; पहा तुम्हाला ओळखायला येते का ?

BOLLYWOOD NEWS : सलमान खानच्या ‘या’ आवडत्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो सोशल मिडीयावर होत आहेत व्हायरल; पहा तुम्हाला ओळखायला येते का ?

1 year ago
मोठी बातमी : महाडमध्ये चवदार तळ्याजवळ जितेंद्र आव्हाडांनी केले मनुस्मृतीचे दहन; राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका

मोठी बातमी : महाडमध्ये चवदार तळ्याजवळ जितेंद्र आव्हाडांनी केले मनुस्मृतीचे दहन; राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.