Go First Flight Update : Go First Flight ला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. Go First ने ३ मे पासून सर्व उड्डाणे रद्द केली होती. गुरुवारीच Go First ने ट्विट करून माहिती दिली होती की, एअरलाइन्सने 23 जुलैपर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत, ज्यासाठी एअरलाइन्सनच्या प्रवाशांनी खेद व्यक्त केला होता. आता एव्हिएशन सेक्टर रेग्युलेटर DGCA ने Go First ला अटींसह उड्डाण करण्याची परवानगी दिली आहे. डीजीसीएने Go First चे रिझोल्यूशन प्रोफेशनल शैलेंद्र अजमेरा यांना पत्र लिहून या निर्णयाची माहिती दिली आहे. DGCA ने सांगितलं की, Go First ने 26 जून रोजी ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यासाठी सादर केलेल्या योजनेचा अभ्यास केला आहे आणि नियामकाने स्वीकार केला आहे. डीजीसीएने सांगितलं की, GoFirst अटींसह पुन्हा फ्लाइट ऑपरेशन सुरू करू शकते.
‘या’ आहेत अटी
- एअरलाइन्ससाठी नेहमीच एअर ऑपरेटर प्रमाणपत्र असणे खूप महत्वाचे आहे.
- रिझोल्यूशन प्रोफेशनलला फ्लाइट शेड्यूल, विमानाची स्थिती, पायलट, केबिन क्रू, एएमई, फ्लाइट डिस्पॅचर यांची माहिती रेग्युलेटरला द्यावी लागेल.
- ऑपरेशनमध्ये वापरलेले विमान उडण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत असावे.
- हाताळणी केल्याशिवाय कोणत्याही विमानाचा वापर केला जाऊ नये.
- अंतरिम निधीची उपलब्धता आणि DGCA कडून उड्डाण वेळापत्रकास मंजुरी मिळाल्यानंतर नियोजित उड्डाण ऑपरेशन सुरू केले जाऊ शकते.
- कंपनीमधील कोणताही बदल, ज्याचा रिझोल्यूशन प्रोफेशनलने सादर केलेल्या योजनेवर परिणाम होतो, तो त्वरित डीजीसीएला उपलब्ध करून द्यावा.
- डीजीसीएची परवानगी मिळाल्यानंतरच फ्लॅट तिकिटांची विक्री सुरू करता येईल.
- रिझोल्यूशन प्रोफेशनलला डीजीसीएने मागितलेली माहिती वेळोवेळी द्यावी लागेल.
३ मे पासून उड्डाणे बंद आहेत
कंपनीने ३ मे रोजी दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला होता आणि तेव्हापासून उड्डाणे बंद आहेत. त्यानंतर कंपनीने अनेक वेळा कामकाज सुरू करण्याची मुदत वाढवली आहे. गोफर्स्टने रविवारीही यासंदर्भात नवीन मुदत दिली आहे. सध्या GoFirst 15 विमानांच्या मदतीने दररोज 114 फेऱ्या करण्याची योजना आखत आहे.
कर्जदारांकडून 425 कोटी रुपयांच्या अंतरिम निधीची मागणी
Go First च्या कर्जदारांमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि IDBI बँक यांचा समावेश आहे. Go First चे रिझोल्यूशन प्रोफेशनल शैलेंद्र अजमेरा यांनी पुनरुज्जीवन योजनेसाठी कंपनीच्या कर्जदारांकडून 425 कोटी रुपयांच्या अंतरिम निधीची मागणी केली होती. हा निधी Go First ला त्यांची उड्डाणे आणि इतर ऑपरेशन्स पुन्हा सुरू करण्यास मदत करेल.