Starlink in India : अमेरिकेच्या तीन दिवसीय राज्य दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी टेस्लाचे सहसंस्थापक आणि ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. या भेटी दरम्यान मस्कने स्वत:ला ‘मोदींचा चाहता’ असल्याचे सांगितले. मस्क पुढे म्हणाले की, टेस्ला किंवा स्टारलिंककडून (Starlink Internet in India) ते भारतात गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत. एलॉन मस्क हे स्टारलिंक भारतात आणण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या बैठकीत मस्क यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. (Elon musk meeting with Prime Minister Narendra Modi)

स्टारलिंक इंटरनेट दुर्गम किंवा ग्रामीण भागांसाठी फायदेशीर
या बैठकीचा महत्त्वाचा भाग म्हणजेच मस्कच्या स्टारलिंक इंटरनेट या प्रोजेक्टबद्दल होता. स्टारलिंक इंटरनेट दुर्गम किंवा ग्रामीण भागांसाठी खुप फायदेशीर ठरू शकते. भविष्यातील टेक्नोलॉजीवर काम करणाऱ्या एलॉन मस्कने आता संपूर्ण जगाला सॅटेलाइट इंटरनेट देण्याची योजना आणलीये. एलॉन मस्कचा महत्त्वाकांक्षी SpaceX प्रोजेक्ट जगाला फास्ट आणि परवडणारी इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइड करणारे. एलॉन मस्क यांना 42,000 उपग्रहांद्वारे संपूर्ण जगाला इंटरनेट द्यायचे आहे. यासाठी ते स्टारलिंक कंपनीच्या माध्यमातून जगभरात सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस देणारेत.
स्टारलिंक इंटरनेट कसे कार्य करेल
एलॉन मस्कचे सॅटेलाइट इंटरनेट वायरलेस आहे. ते घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या छतावर सॅटेलाइट डिश अँटेना बसवावा लागेल. हा अँटेना थेट उपग्रहाशी जोडला जाईल. तुमच्या मोबाइलवर सिग्नल पाठवेल आणि तुम्हाला इंटरनेटचा वापर करता येईल. इंटरनेट पूर्णपणे वायरलेस असल्यामुळे जगाच्या कोणत्याही कानाकोपर्यात तुम्हाला सहज इंटरनेटची रेंज मिळू शकते.
स्टारलिंक इंटरनेट गती
सध्या युजर्सना 150Mbps पर्यंत स्पीड मिळत आहे. एलॉन मस्कने त्याचा वेग 300Mbps पर्यंत आणण्याचे सांगितले आहे. पण फायबर इंटरनेटच्या तुलनेत ते खूपच कमी आहे. याचे कारण असे की, सध्या ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा पोहोचलेली नाही, त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे.
स्टारलिंक इंटरनेटची किंमत
सध्या त्याची किंमत जास्त आहे. भारतात त्याची प्री-ऑर्डर सुमारे $99 म्हणजेच 7000 रुपयांपासून सुरू झालीये. आता त्याची कॉस्ट खूप जास्त आहे, पण येणाऱ्या काळात ती स्वस्त होऊ शकते.
स्टारलिंक सेवा 56 पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध
मस्कची कंपनी सध्या 56 हून अधिक देशांमध्ये उपग्रह इंटरनेट प्रवेश कव्हरेज प्रदान करते. भविष्यात 2023 नंतर जागतिक मोबाइल फोन सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे. डिसेंबर 2022 मध्ये, SpaceX ने 1 दशलक्ष ग्राहकांचा टप्पा ओलांडण्याची घोषणा केली तर मे 2023 पर्यंत 1.5 दशलक्ष ग्राहकांपर्यंत वाढ झालीये.