मध्य प्रदेश : मध्य प्रदेश (एमपी) च्या बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे प्राणनाथ म्हणून वर्णन करणाऱ्या शिवरंजनी तिवारी गंगोत्रीहून गंगाजल घेऊन मध्य प्रदेशात परतलीये. दरम्यान, तिने आपल्या लग्नाबाबत मोठं वक्तव्य केलंय.
वैद्यकीय विद्यार्थिनी शिवरंजनी तिवारी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना भेटण्यासाठी छतरपूरला पोहोचलीये. मात्र, बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री पाच दिवसांच्या मुक्कामावर आहेत. शिवरंजनीबद्दल सांगितलं जातंय की, तिला धीरेंद्र शास्त्रीसोबत लग्न करण्याची इच्छा आहे. यावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले होते की, काही लोक रोज लग्न ठरवतात आणि प्रत्येक वेळी मुली बदलतात. आज 16 जून असून या दिवशी उत्तराखंडमधील गंगोत्री धाम येथून मध्यप्रदेशात परतलेल्या शिवरंजनीने बागेश्वर धाम गाठण्याचा संकल्प केल्याची माहिती समोर आलीये.
शिवरंजनी लग्नाबाबत काय बोलली?
शिवरंजनी म्हणाली, गंगोत्री ते छतरपूर या पायी चाललेल्या कलश यात्रेत प्रचंड उकाड्यासह अनेक आव्हाने होती. बागेश्वर धामला येताना मला अस्वस्थ वाटले, अशक्तपणाची तक्रार होती, पण मी एक संकल्प पूर्ण केला. शिवरंजनी तिवारीने बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याशी लग्न करण्याच्या संकल्पावर मोठं वक्तव्य केलं. ती म्हणाली, ‘मी कधीच लग्न करण्याचा संकल्प आहे असं म्हटलं नाही. यासोबतच भगवे कपडे परिधान करण्याबाबत होत असलेल्या टीकेवरही शिवरंजनींनी स्पष्टीकरण दिलं. विशेष म्हणजे, काही तासांपूर्वी बद्रीनाथहून आलेले शंकराचार्य ज्योतिष पीठाचे मीडिया प्रभारी डॉ. शैलेंद्र योगीराज सरकार यांनी भगवे कपडे परिधान करण्यावर प्रश्न उपस्थित केला होता.
धीरेंद्र शास्त्री यांनाच प्राणनाथचा अर्थ कळतो
शिवरंजनी तिवारी 14 जूनला छतरपूरला पोहोचली. यूपीच्या महोबा जिल्ह्यातून छतरपूर सीमेवर पोहोचलेल्या शिवरंजनी तिवारीचे लोकांनी जल्लोषात स्वागत केलं. आजच्या शुभ दिवसाबाबत तिने सांगितलं होतं की, जेव्हा ती आपल्या प्रियकराला भेटेल तेव्हा हे एक अद्भुत दृश्य असेल. आपल्या ताज्या वक्तव्यात तिने असंही म्हटलं की, धीरेंद्र शास्त्री यांनाच प्राणनाथचा अर्थ कळतो. अशा परिस्थितीत आता त्यांनीच बागेश्वर बाबासोबत लग्नाच्या अटकेला पूर्णविराम दिल्याचे समजते.