ओडिशा : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातातील ‘कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी’ (CRS) यांचा अहवाल समोर आलांय. ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर त्याच्या तपासाची जबाबदारी ‘कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी’ (CRS) यांना देण्यात आली होती. सीआरएसच्या तपासात असं आढळून आलं की, लेव्हल-क्रॉसिंग लोकेशन बॉक्समध्ये तारांचे चुकीचं लेबलिंग असल्याचं उशिरा कळलं. मेंटेनंस दरम्यान त्यात त्रुटी आढळून आल्या. या त्रुटींकडे आधीच दुर्लक्ष केले नसते तर दुर्घटना टाळता आली असती. रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अहवालात सिग्नल आणि दूरसंचार विभागातील अनेक स्तरावरील त्रुटी या अपघाताला कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय.
293 लोकांचा मृत्यू तर 1000 हून अधिक लोक जखमी
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या अपघातासाठी सिग्नलिंग विभागाला प्रामुख्याने जबाबदार धरण्यात आलंय. सिग्नलिंग कंट्रोल सिस्टममध्ये त्रुटी शोधण्यात अयशस्वी झाल्यामुळे या अपघातासाठी स्टेशन मास्टरलाही जबाबदार धरण्यात आलंय. स्टेशन मास्तरांनी बिघाड शोधला असता तर अपघात टाळता आला असता. 2 जूनला ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 293 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले होते. चेन्नईहून हावडाकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस लूप लाइनमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. यानंतर कोरोमंडलचे अनेक डबे रुळावरून घसरले. हे डबे जवळून जाणाऱ्या यशवंतपूर हावडा एक्स्प्रेसला धडकले.
अहवालात कोणत्या त्रुटी समोर आल्या?
सीआरएस अहवाल गेल्या आठवड्यात रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला. त्यानुसार घटनास्थळी उपस्थित सिग्नलिंग कर्मचार्यांनी सांगितले की, अपघाताच्या दिवशी लेव्हल क्रॉसिंगवरील ‘इलेक्ट्रिक लिफ्टिंग बॅरियर’ बदलताना टर्मिनलवर चुकीचे चुकीचे अक्षरं दिसले त्यामुळे इतर समस्यांना सामोरे जावं लागलं. याशिवाय, ‘पॉइंट’ (गाडीला एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर नेणारा मोटार चालवणारा भाग) ची स्थिती दाखवणारं सर्किट देखील पूर्वी बदलण्यात आलं होतं. सर्व वायर्स जोडणाऱ्या लोकेशन बॉक्समध्ये चुकीची अक्षरे होती, म्हणजेच ते प्रत्येक फंक्शनबद्दल चुकीची माहिती देत होते.
CRS तपासणीत असही समोर आलंय की, वायरिंग डायग्राम पूर्ण करणे (टेक्नीशियनला वायरिंग पुन्हा कसे जोडायचे हे तंत्रज्ञ दर्शवणारे पत्रक) 2015 मध्ये कागदावर बदललं गेलं आणि मंजूर केलं गेलं. परंतु लेबलिंगमधील बदल भौतिकदृष्ट्या केला गेला नाही. टर्मिनल ट्रॅकवरील सर्किटचं नावही दुरुस्त करण्यात आलं नाही. अहवालात चुकीची अक्षरं लिहिल्याचं सांगण्यात आलंय. त्या दुरुस्त करण्याचा कोणताही प्रयत्न झाला नसल्याचं यात म्हटलंय.