नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्यात येणार असल्याची घोषणा अमित शहा यांनी केली आहे.
एका कार्यक्रमादरम्यान अमित शहा यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अमित शहा म्हणाले कि, “मी स्पष्ट करू इच्छितो की सीएए कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व हिरावून घेणार नाही. धार्मिक छळाला सामोरे जाणाऱ्या पाकिस्तानी, अफगाण आणि बांगलादेशी अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणे हेच या कायद्याचे उद्दिष्ट आहे. “
अमित शहा म्हणाले की, जेव्हा देशाची फाळणी झाली आणि तिथे अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले. त्यावेळी त्या सर्वांना भारतात पळून जायचे होते, तेव्हा काँग्रेसने सांगितले की, तुम्ही येथे या, तुम्हाला येथे नागरिकत्व दिले जाईल. “
मनोज जरांगेंचे आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरु; सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी – जरांगे पाटील
विरोधक मुस्लिमांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला. सीएएबाबत आमच्या मुस्लिम बांधवांची दिशाभूल आणि चिथावणी दिली जात आहे. सीएए हा केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. ” नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या सीएएमध्ये ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या बिगर मुस्लिम स्थलांतरितांना भारताचे नागरिकत्व देण्याचा उद्देश आहे.










