महाराष्ट्र : गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस Weather Forecast बरसत आहे. गारपिटीचा देखील मोठा फटका अनेक भागांना बसला आहे. सध्या राज्यातील वातावरण बदलले असून काही भागात उष्णतेने खरं केला आहे. तर काही भागात अजूनही थंडीची चादर आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून रब्बी हंगामातील पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार, पुढील दोन दिवस पावसाची अशीच परिस्थिती राहील असं सांगितलं आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात गारपीटीसह जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.