Mumbai Local Train Restaurant: सोशम मीडियावर (Social Media) नानाप्रकारचे व्हिडिओ व्हायरल (video Viral) होत असतात. त्यातले काही व्हिडिओ प्रेरणादायी असतात तर काही व्हिडिओ आपल्याला विचार करायला भाग पडतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मुंबईची लाईफलाईन (Mumbai Lifeline) म्हणून ओळखली जाणाऱ्या लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे दररोज शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात. दरम्यान, मुंबईच्या लोकलमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, दोन तरुणांच्या युनिक स्टार्टअपने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या तरुणांनी मुंबई लोकल ट्रेनमध्ये चालते फिरते रेस्टॉरंट सुरु केले आहे, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. (Viral Video Mumbai Local Train five star restaurat)
आर्यन कटारिया आणि सार्थक सचदेवा यांनी हा स्टार्टअप सुरू केला आहे. दोघांनीही आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली. यामध्ये हे दोघेही लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकांशी संवाद साधताना दिसत आहेत. तसेच त्यांचे अनुभव शेअर करत आहेत. कटारिया आणि सचदेवा सांगतात की, त्यांनी मुंबई लोकल ट्रेनमध्ये फाईव्ह स्टार रेस्टॉरंट सुरू केले आहे. दोघांनीही याला टेस्टी तिकीट असे नाव दिले आहे. त्यांनी प्रवाशांमध्ये मेन्यू कार्ड वाटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
आपल्या स्टार्टअपबाबत पहिला अनुभव शेअर करताना कटारिया आणि सचदेवा म्हणाले की,”जेव्हा लोकांना आमच्या स्टार्टअपचे मेन्यू कार्ड दाखवले, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. मुंबई लोकलमध्ये असे काही घडू शकते, असा त्यांनी कधीच विचार केला नसेल.”
आणखी वाचा – Amravati Crime : लहान भावानं मटण खालं म्हणून भारत हरला, असं म्हणत मोठ्या भावानं केली हत्या
व्हायरल व्हिडिओमध्ये हे दोघेही मुले प्रवाशांना गरम खाद्यपदार्श वाढताना दिसत आहे. ज्यात मॅगी सारख्या पदार्थांसह जिलेबी सॉस आणि स्वीट डेजर्ट यांचा समावेश आहे. हे लोक प्रवाशांना दिले जाणारे खाद्यपदार्थ मोठ्या बॅगमध्ये घेऊन जात आहेत. अनेकांना त्यांची कल्पना आवडली आहे. अनेक प्रवासी त्यांच्यासोबत सेल्फीदेखील घेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.