महाराष्ट्र : सध्या राज्यात उन्हाळा सुरू आहे. राज्याच्या काही भागात उन्हाळ्याचा कहर सुरू असतानाच आता विदर्भातील जिल्ह्याला हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उन्हाळा सुरू झाला तरी काही दिवसांपासून राज्यातील काही ठराविक भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट देखील होते आहे. अशातच आता हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये विदर्भातील जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून गारपीटीची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ही परिस्थिती पुढील चार ते पाच दिवस राहणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आल आहे. सध्या अकोला ,वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू आहे. एकीकडे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान सुरू असतानाच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा पुढचे चार ते पाच दिवस रेड अलर्ट जारी केला आहे.