महाराष्ट्र : सध्या हिवाळा Rain Update हा ऋतू सुरू आहे. महाराष्ट्राच्या काही भागात कडाक्याच्या थंडीने नागरिक हैराण झाले आहेत, तर अद्याप देखील मुंबई पुण्यासारख्या भागामध्ये थंडीने गोठवून टाकलेले नाही. पण आता अचानक महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी बरसल्या आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज दक्षिण कोकण भागामध्ये तुरळक पाऊस बरसणार आहे. तर राज्यात देखील पुढचे दोन दिवस पावसाच्या सरी बरसू शकतात. वातावरणातील या बदलांमुळे तापमानात सातत्याने चढ उतार होतो आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये रविवार पर्यंत हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे. त्यासह नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एन हिवाळ्यात पावसाच्या सरी बरसल्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला आहे. शेतकऱ्यांनाही आता पुन्हा नुकसानीचा सामना करावा लागतो आहे. त्यासह सातत्याने बदलणाऱ्या हवामानाने आजार आणि रोगराई पसरण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे तब्येत देखील सांभाळणे आवश्यक आहे.