पुणे : स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत केंद्र सरकारकडे रुग्ण हक्क परिषदेच्या Patient Rights Council वतीने मागणी करण्यात आली. महात्मा फुले वाडा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले Krantisurya Mahatma Jyotiba Phule यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, पुणे शहर अध्यक्ष अपर्णा मारणे साठे, संचालक राजाभाऊ कदम, रोहिदास किरवे, प्रभा आवलेलू, फारूक तांबोळी, वसीम तांबे, रवींद्र चव्हाण आदि उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले लिखित शेतकऱ्याचा आसूड ग्रंथाच्या 100 प्रतीचे उपस्थिताना वाटप करण्यात आले.