महाराष्ट्र्र : राज्य सरकारने State Government एक मोठा निर्णय घेतला आहे. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी राज्य सरकार एक नवी योजना आणणार आहे. त्या अंतर्गत महत्त्वाच्या शहरांत ‘पिंक रिक्षा’ Pink Rickshaw Scheme ही योजना लवकरच सुरू करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे Women and Child Development Minister Aditi Tatkare यांनी दिली आहे.
पिंक रिक्षा ही योजना राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या शहरांचा आहे. तसेच महिलांना सॅनिटरी पॅड पुरविण्यासाठी गरजू लाभार्थी निवड-निकष तपासून ही योजना यशस्वीपणे राज्यात राबवावी अशा सूचना आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत.