अहमदनगर : ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बबनराव ढाकणे हे मागच्या तीन आठवड्यापासून निमोनिया आजाराने त्रस्त होते. अहमदनगरमधील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. हृदयविकाराच्या झटक्याने आज त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. बीड, अहमदनगर जिल्ह्यात बबनराव ढाकणे यांनी मोठं काम उभं केलं. पाथर्डीसाठी त्यांनी सामान्य लोकांच्या हितासाठी काम केलं. आज बबनराव ढाकणे यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यात शोक व्यक्त होत आहे.
बबनराव ढाकणे यांचं काल रात्री निधन झालं. पाथर्डीतील हिंदसेवा वसतिगृहात त्यांचं पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणात आहे. आज दुपारी एक वाजेपासून ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत बबनराव ढाकणे यांचं यांचं पार्थिव हिंदसेवा वसतिगृहात असेल. उद्या (शनिवार, 28 ऑक्टोबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.