Mumbai LPG Gas Cylinder Blast Bandra : मुंबईतील वांद्रे परिसरात शनिवारी (१८ नोव्हेंबर २०२३) पहाटे एलपीजी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट (Mumbai LPG Gas Cylinder Blast Bandra) झाल्याची माहिती समोर आली. या स्फोटमध्ये लागलेल्या आगीमुळे ८ जण होरपळून तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून अपघातात जखमी झालेल्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय. (Mumbai LPG Gas Cylinder Blast Bandra)
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत ५ जण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आणखी वाचा – Cyrus Poonawalla : डॉ. सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा झटका
मुंबईतील वांद्रे परिसरात शनिवारी पहाटे एलपीजी गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत पाच जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली. एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट कशामुळे झाला? अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, या घटनेने परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.