Marathi Board : सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) सगळ्याच दुकांनावर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशावरुनच जागोजागी मराठी पाट्या लावल्या जात आहेत. पण काही ठिकाणी या आदेशाची अमंलबजावणी केलीली दिसत नाहीय. या साठी २५ नोव्हेंबर ही डेड लाइन देखील दिली होती. दरम्यान, मुंबई पालिकेने (BMC) आणखी दोन दिवस मुदत देऊन २७ पर्यंत मराठी पाट्या लावण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, अद्याप अनेक दुकानदारांनी मराठी फलक (Marathi signboards) लावले नसल्याने आता मुंबई महापलिका थेट कारवाईला सुरुवात करणार आहे. या साठी ४८ पथक २४ वॉर्डमध्ये फिरणार असून ज्यांनी मराठी फलक लावले नाही त्यांच्यावर प्रती कामगार २ हजार रुपये दंड तसेच कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे. (Marathi signboards mumbai bmc action on marathi signboards mns aggressive supreme court)
सुप्रीम कोर्टाने सर्व दुकानांच्या पाट्या या मराठीत लावण्याचे आदेश दिले होते. यासाठी २५ नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिली होती. ही मुदत संपली आहे. ज्या दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या नाहीत त्यांच्यावर आज मंगळवार पासून (दि २८) थेट कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई पालिकेने ज्यांनी यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल ४८ पथक २४ वॉर्डमध्ये गस्त घालणार आहेत.
आणखी वाचा – Pune Rape News : धक्कादायक! ५ वर्षांच्या चिमुकल्यांना अश्लील व्हिडिओ दाखवून बलात्कार
मुंबईत मराठी पाट्या असाव्या असा निर्णय मुंबई महागरपालिकेने घेतला होता. ज्या दुकानात जास्त कामगार असतील त्या दुकानात मराठी पाट्या लावणे अनिवार्य केले होते. दरम्यान, काही दुकानदारांनी मराठीत फलक लावले होते. तर काही दुकानदारांनी याला विरोध केला होता. तसेच या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने मुंबई पालिकेच्या बाजूने निर्णय देऊन मराठी पाट्या लावण्यासाठी २५ नोव्हेंबर ही मुदत दिली होती. तसेच दुकांनाना गड किल्ले, महान व्यक्तींची नावे देण्यात येऊ नये असा देखील नियम करण्यात आला होता. दरम्यान, आज पासून मुंबई महागर पालिका कारवाईचा बडगा उचलणार आहे. जर मराठी पाटी ंनअसेल तर प्रती कामगार दंड आकरला जाणार आहे. तरी देखील ऐकलं नाही तर मात्र त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
मुंबईत तब्बल पाच लाख दुकाने आहेत. या पैकी दोन लाख दुकानांवर मराठी फलक लावण्यात आलेले नाहीत. मुंबई पालिकेने १० ऑक्टोबर २०२२ ते ४ नोव्हेंबर २०२२ या काळात २८ हजार ६५३ दुकानांची तपासणी करत त्यांच्यावर कारवाई केली होती. या कारवाईत २३ हजार ४३६ दुकानांनी मराठी पाट्या लावल्या होत्या तर ५ हजार २१७ दुकानांनी मराठी पाट्या शासकीय नियमानुसार लावल्या नव्हत्या. काही पाट्यांवरील अक्षरे मराठी हिंदी व इंग्रजीत होती. अशा सर्व दुकानदारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा – Pooja sawant post: “We are engaged…” अखेर पूजा सावंतनं उरकला साखरपुडा, कोण आहे ‘ही’ व्यक्ती?
मराठी मुद्यावरून मनसे नेहमी आग्रही राहिली आहे. त्यात मुंबईतील सर्व दुकानांची नावे ही मराठीत असावी असा आग्रह देखील मनसेचा आहे. मनसेने देखील ५ दिवसांची मुदत देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. रविवारी ठाण्यातील मराठी पाट्या नसलेल्या दुकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले होते. त्यामुळे आज पासून मनसे काय भूमिका घेते या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.