Kishori Pednekar ED Case: करोनाकाळात मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालय ईडीने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना समन्स जारी केले होते. त्यांना आज 23 नोव्हेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. ईडीच्या समन्सनुसार आज किशोरी पेडणेकर या ईडी कार्यालयात पोहोचल्या होत्या. मात्र, किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू असताना भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे देखील ईडी (ED) कार्यालयात पोहोचले होते. या मुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Kishori Pednekar ED Case Covid-19 body bag scam Kirit Somaiya)
किशोरी पेडणेकर यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू असतानाच किरीट सौमया अचानक ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतरच किशोरी पेडणेकर यांची ईडी चौकशी करण्यात येत आहे.
चौकशीसाठी जात असताना किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. ज्यारितीने उघडे-नागडेबाब बोलताहेत , उत्तर द्यावीच लागणार. तर तुम्ही ज्यांच्याविरोधात कागद फडकावून मोठमोठे आरोप करत होतात. कोल्हापुरला गेले होतात ते आता मंत्री कसे झाले याचेही उत्तर तुम्हाला द्यावेच लागेल. तुम्ही दरवेळी दबावतंत्राचा वापर करुन चुकीचे कागदपत्रे पुढे करत होते, असा किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
मला गर्व आहे मी महापौर होते आणि नागरिकांसाठी चांगले काम केलंय. त्यामुळं चौकशीला सामोरे जात आहे. महापालिकेच्या कोणत्याही घोटाळ्याशी माझा संबंध नाही. अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, महापालिकेचे अधिकारी, कंत्राटदार यांनी मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला असेल तर निश्चित चौकशी झालीच पाहिजे. आम्ही त्यांना पाठिशी घाला, असं म्हणणार नाही. परंतु जाणूनबुजून तुम्ही त्यांच्यावर आरोप केले ते आता मोदींकडे गेले. तेव्हा त्यांच्यावरील आरोप संपले का? मुंबईकरांना याचे उत्तरे द्या, असा पलटवार किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.