मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy CM Ajit Pawar यांना डेंग्यूची Dengu लागण झाल्यानंतर त्यांनी 15 दिवस विश्रांती घेतली. या काळात विरोधकांनी त्यांच्यावर अनेक टीका टिप्पणी केल्या. अजित पवारांचं आजारपण खरं की खोटं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. आज या चर्चांवर अजित पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले कि , ‘मी लेचापेचा माणूस नाही. गेले 15 दिवस डेंग्यूमुळे आजारी होतो, राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही. मी माझी मतं गेल 32 वर्षे स्पष्टपणे मांडत असतो’, असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच अमित शाहा यांना तक्रार करण्यासाठी भेटलो नसल्याचं स्पष्टीकरण देखील या वेळी अजित पवारांनी दिले आहे.
अजित पवार म्हणाले, माजी उपपंतप्रधान पहिले मुख्यमंत्री चव्हणांची आज पुण्यतिथी म्हणून त्यांना अभिवादन केलं. दिवाळीपूर्वी डेंग्यूमुळे 15 दिवस वाया गेले. राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही. मी माझी मतं गेल 32 वर्षे स्पष्टपणे मांडत आलो आहे. मध्यंतरी अमित शहांना भेटलो. तक्रार करण्यासाठी अमित शाहांना भेटल्याची माहिती खोटी आहे. तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही.
हे वाचलेत का ? Yashwantrao Chavan Death Anniversary : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
भाड्याच्या जागेत शासकीय ऑफिस नको आहेत.राज्यात अनेक बदल झाले आहेत. शासकीय इमारती चांगल्या असाव्यात त्या सरकारी जागेत असाव्यात. पुढची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून चांगले आर्किटेक घेऊन,अधिकाऱ्यांशी बोलून इमारती बांधत आहेत. वेगात काम सुरू आहेत,निधी कमी पडू देणार नाही, कामाच्या बाबतीत गती मंदावू नये असा आमचा मानस आहे. कृषी भवन, कामगार भवन, शिक्षण भवन, सारथीची इमारत या सरकारी जागेत असाव्यात असा निश्चय केला होता. त्याची बहुतेक काम सुरु झालेली आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील सारथी संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन संस्थेच्या आवारात सुरु असलेल्या बांधकामाची पाहणी केली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवारांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काम लवकर करण्याच्या सूचना दिल्या. बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. मराठा समाजाला वेगवेगळ्या योजनांचा लाभ व्हावा आणि मराठा समाजातील तरुणांना प्रशिक्षण मिळावे यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.