मुंबई : रेडिओ विश्वातील सुप्रसिद्ध उद्घोषक अमीन सयानी Amin Sayani यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अमीन सयानी यांनी मंगळवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा राजिल सयानी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
अमीन सयानी यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांनी जगाचा निरोप घेतला. अंत्यसंस्काराबाबत त्यांच्या मुलाने लवकरच अपडेट देणार असल्याचे सांगितले.
21 डिसेंबर 1932 रोजी जन्मलेले अमीन सयानी रेडिओ जगतातील प्रसिद्ध उद्घोषक होते. रेडिओ विश्वात त्यांचे मोठे योगदान होते. ‘गीत माला’ हा त्यांचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या एका शोने अमीन सयानी यांना बरीच लोकप्रियता मिळवून दिली. सुंदर आवाज आणि आकर्षक स्टाईलमुळे ते चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होते. अमीन सयानी यांनी आपल्या रेडिओ कारकिर्दीत ५० हजारांहून अधिक कार्यक्रम केले आहेत.