इंदापूर : इंदापूरच्या बावडा या गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी गेलेल्या बसला अपघात Accident News झाला आहे. या अपघातात शाळेचे शिक्षक बाळकृष्ण काळे यांचा मृत्यू झाला आहे. त्यासह आणखी एक शिक्षक आणि काही विद्यार्थी देखील जखमी झाले असल्याची माहिती मिळते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील बावडा या गावातील श्री शिवाजी विद्यालयाची सहल कोकणात गेली होती. आज सर्व विद्यार्थी आनंदात परत घरी येत होते. या परतीच्या प्रवासामध्येच सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान हा अपघात झाला असल्याचे समजते आहे. एक जागी उभा असलेल्या टेम्पोला बसची धडक बसली या धडकेमध्ये बस चालकाच्या शेजारी बसलेले शिक्षक बाळकृष्ण काळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यासह शिरसाठ हे शिक्षक आणि काही विद्यार्थी देखील जखमी झाले असल्याचे समजते आहे. जखमी शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर अकलूज मधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
प्रवास करताना काही गोष्टी टाळाच !
१. अनेक घटना या पहाटेच्या सुमारास घडतात. गरज नसेल तर रात्री उशिरा आणि पहाटेच्या सुमारास प्रवास करूच नका.
२. वाहन चालकाची पुरेपूर झोप आणि विश्रांती महत्वाची असते.
३. वेग बेतानेच असावा. अति घाई सांकट नेई !
४. वाहन चालवण्याचे सर्व नियम काटेखोर पाळाच.
५. मोठा प्रवास करण्यापूर्वी वाहनांची योग्य तपासणी, जास्तीचे टायर, पाणी, इंजिन ऑइल इत्यादी गोष्टी करा.
६. गाडीत फर्स्ट ऍड ठेवा.
७. गाडीच्या काचा पुसण्यासाठी कापड ठेवा. फ्रंट ग्लास स्वच्छ ठेवा.