• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, July 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home INFORMATIVE

‘Bharat Ratna’ LK Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते ‘भारतरत्न’ लालकृष्ण अडवाणी यांचा आजपर्यंतचा जीवनप्रवास कसा आहे; वाचा हि खास माहिती

Web Team by Web Team
February 3, 2024
in INFORMATIVE, देश-विदेश, मुख्य बातम्या
0
‘Bharat Ratna’ LK Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते ‘भारतरत्न’ लालकृष्ण अडवाणी यांचा आजपर्यंतचा जीवनप्रवास कसा आहे; वाचा हि खास माहिती
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट टाकून भारतरत्न मिळाल्याची माहिती दिली आहे.

I am very happy to share that Shri LK Advani Ji will be conferred the Bharat Ratna. I also spoke to him and congratulated him on being conferred this honour. One of the most respected statesmen of our times, his contribution to the development of India is monumental. His is a… pic.twitter.com/Ya78qjJbPK

— Narendra Modi (@narendramodi) February 3, 2024

पाकिस्तानातील कराची येथे जन्मलेले लालकृष्ण अडवाणी यांनी सर्वाधिक काळ भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. एवढेच नव्हे तर राम मंदिर चळवळीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. चला तर मग जाणून घेऊया त्याच्या आयुष्याशी निगडीत काही रंजक गोष्टी…

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी सिंध प्रांतात (पाकिस्तान) झाला. कराचीच्या सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांनी गिदुमल नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९४४ मध्ये ते कराचीयेथील मॉडेल हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले.
मात्र १९४७ मध्ये देशाची फाळणी झाल्यानंतर अडवाणी ंच्या कुटुंबाला आपलं घर सोडून भारतात यावं लागलं.

मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. या काळात ते संघाशीही जोडले गेले होते. किशनचंद अडवाणी यांच्या घरात जन्मलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी २५ फेब्रुवारी १९६५ रोजी कमला अडवाणी यांच्याशी लग्न केले. त्यांना प्रतिभा आणि जयंत ही दोन मुले आहेत.

अडवाणींची राजकीय कारकीर्द

  • १९४२ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील
  • स्वातंत्र्यानंतर अडवाणींचा राजकारणातील प्रवेश महापालिका निवडणुकीतून झाला.
  • १९५७ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या मदतीसाठी ते दिल्लीला गेले.
  • १९५८-६३ मध्ये त्यांनी दिल्ली प्रदेश जनसंघाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
  • एप्रिल १९७० मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेले.
  • डिसेंबर १९७२ मध्ये लालकृष्ण अडवाणी यांची भारतीय जनसंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
  • आणीबाणीच्या काळात २६ जून १९७५ रोजी त्यांना बंगळुरूयेथून अटक करण्यात आली.
  • आणीबाणी उठल्यानंतर मार्च १९७७ ते जुलै १९७९ या काळात ते माहिती व प्रसारण मंत्री होते.
  • 1980 मध्ये भाजपच्या स्थापनेपासून ते 1986 पर्यंत पक्षाचे सरचिटणीस होते.
  • 1986 मध्ये लालकृष्ण अडवाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.
  • ३ मार्च १९८८ रोजी पुन्हा त्यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
  • १९९१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली.
  • १९९६ मध्ये स्थापन झालेल्या अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते गृहमंत्री होते. 13 दिवसांनंतर हे सरकार कोसळले
  • ऑक्टोबर १९९९ ते मे २००४ या काळात त्यांनी गृहमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली.
  • जून २००२ ते मे २००४ या काळात ते देशाचे माजी उपपंतप्रधान होते.
  • अडवाणी चार वेळा राज्यसभेचे आणि सहा वेळा लोकसभेचे सदस्य होते.
  • अडवाणी २००४ ते २००९ या काळात लोकसभेत विरोधी पक्षनेते होते.
  • १० डिसेंबर २००७ रोजी, भाजप संसदीय मंडळाने २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे घोषित केले.
  • युपीए सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर अडवाणीयांच्या जागी सुषमा स्वराज यांनी १५ व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली.
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

महाराष्ट्र हादरला ! उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार; गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विरोधक आक्रमक VIDEO

Next Post

Ulhasnagar Firing Case : ” कायद्यासमोर सगळे समान;कोण कुठल्या पक्षाचा हे विचार न करता कायदेशीरच कारवाई केली जाईल..! ” गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Next Post
Ulhasnagar Firing Case : ” कायद्यासमोर सगळे समान;कोण कुठल्या पक्षाचा हे विचार न करता कायदेशीरच कारवाई केली जाईल..! ” गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Ulhasnagar Firing Case : " कायद्यासमोर सगळे समान;कोण कुठल्या पक्षाचा हे विचार न करता कायदेशीरच कारवाई केली जाईल..! " गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

DEPUTY CM AJIT PAWAR : सर्वसामान्य रुग्णाला शासकीय रुग्णालयातील सुविधांचा लाभ द्या

DEPUTY CM AJIT PAWAR : सर्वसामान्य रुग्णाला शासकीय रुग्णालयातील सुविधांचा लाभ द्या

2 years ago
काँग्रेसच्या महत्त्वाच्या विधिमंडळ बैठकीत ‘या’ 7 आमदारांची दांडी; पुन्हा राजकीय भूकंप होणार ?

काँग्रेसच्या महत्त्वाच्या विधिमंडळ बैठकीत ‘या’ 7 आमदारांची दांडी; पुन्हा राजकीय भूकंप होणार ?

1 year ago
Maratha Reservation : येवल्याचं येडपट ! ” पैसे देऊन याचीका दाखल करायला लावल्या…! ” जरांगे पाटलांची भुजबळांवर कडवी टीका

Maratha Reservation : येवल्याचं येडपट ! ” पैसे देऊन याचीका दाखल करायला लावल्या…! ” जरांगे पाटलांची भुजबळांवर कडवी टीका

1 year ago
महत्वाची बातमी : पेमेंट करताना होणारे फसवणूकीचे वाढते प्रकार लक्षात घेता Google Pay ने आणले ‘हे’ महत्वाचे फिचर, वाचा सविस्तर

महत्वाची बातमी : पेमेंट करताना होणारे फसवणूकीचे वाढते प्रकार लक्षात घेता Google Pay ने आणले ‘हे’ महत्वाचे फिचर, वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.