Bank Employees Strike : नागरिकांनो महत्वाची बातमी आहे. बँक कर्मचारी 13 दिवस संपावर Bank Employees Strike जाणार आहेत. याबाबतची अधिसूचना ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशनने जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार 4 डिसेंबर ते 20 जानेवारी या कालावधीत विविध तारखांना हा संप करण्यात येणार आहे. या काळात देशातील विविध बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.
काय आहेत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या ?
1) सर्व बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात स्टाफची नियुक्ती करण्यात यावी.
2) बँकांमधील कायमस्वरूपी नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग बंद करण्यात यावे.
3) आउटसोर्सिंगशी संबंधित सेटलमेंटमधील तरतुदी आणि त्याचे उल्लंघन थांबवावे.
डिसेंबरमध्ये ‘या’ तारखांना बँक कर्मचारी संपावर जाणार !
▪️4 डिसेंबर – PNB, SBI आणि पंजाब अँड सिंध बँक
▪️5 डिसेंबर – बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया
▪️6 डिसेंबर – कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया
▪️7 डिसेंबर- इंडियन बँक आणि युको बँक
▪️8 डिसेंबर – युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र
▪️11 डिसेंबर – खासगी बँकांचा संप
▪️जानेवारी महिन्यातील संपाची सविस्तर यादी ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशनने जारी केली आहे.