येत्या काळात आणखी एका महामारीचं संकट आपल्यासमोर येणार आहे, असा दावा ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी केला आहे. यूकेच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, डिसीज एक्स ही महामारी कोरोनापेक्षाही भयंकर ठरू शकते. इतकंच नाही तर, या नवीन विषाणूचा प्रकोप 1918-1920 च्या विनाशकारी स्पॅनिश फ्लूसारखा प्रभाव असू शकतो, असा दावाही या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे. युके वॅक्सीन टास्कफोर्सचे अध्यक्ष डेम केंट बिंघम यांनी धोक्याचा इशारा देत म्हटलं आहे की, डिसीज एक्स महामारी कोरोना पेक्षा सात पटीने धोकादायक ठरू शकतो.
5 कोटी जणांचा मृत्यू होण्याची शक्यता
2020 मध्ये जगभरात कोविड-19 महामारीची सुरुवात झाली. यामुळे जगभरात सुमारे 25 लाख लोकांचा मृत्यू झाला. तथापि, या महामारीनंतर, कोविड-19 ची लस उपलब्ध आहे. दरम्यान, यूकेच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, येत्या काळात आणखी एक महामारी आपल्यासमोर येणार आहे, ज्याला डिसीज एक्स असे नाव देण्यात आले आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या वैद्यकीय तज्ज्ञांनी भविष्यातील महामारीचं कारण ठरु शकणाऱ्या या आजाराबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. यूकेच्या लस टास्कफोर्सचे अध्यक्ष असलेल्या डेम केट बिंघम यांनी धोक्याचा इशारा देत सांगितल आहे की, भविष्यातच साथीच्या रोगामुळे सुमारे 5 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. शास्त्रज्ञांच्या या दाव्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.