• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home आरोग्य

Corona ‘JN-1’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

Web Team by Web Team
December 29, 2023
in आरोग्य, मुख्य बातम्या
0
Corona ‘JN-1’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : कोरोनाने २०२०-२२ मध्ये जगाला अत्यंत वाईट काळ दाखवला. आजही कोणी त्या वाईट दिवसांची आठवण जरी काढली तरी लोक धास्ती घेतात. अशात आता परत कोरोनाच्या ‘जेएन-१’ Corona ‘JN-1’ व्हेरियंटने एंट्री केली आहे. महाराष्ट्रासह देशभरात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरू लागले आहे. कोरोनाचा ‘जेएन-१’ हा नवीन उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे पालन करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री
प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.दरम्यान राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आली असून या टास्क फोर्सची पहिली बैठक सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आली असून, या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) साथी आणि संसर्गजन्य विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज झालेल्या बैठकीस आरोग्य विभागाचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक धीरज कुमार आणि टास्क फोर्स सदस्य उपस्थित होते.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024
Maharashtra Politics : ” काँग्रेसचे गल्लीतले नेते यांना टपल्या मारायला लागले, ही यांची लायकी…!” नितेश राणेंची संजय राऊतांवर घणाघाती टीका, नेमकं काय म्हणाले राणे ? वाचा सविस्तर

‘जेएन-१’ साठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असली तरी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तयारीनिशी सतर्क राहण्याच्या सूचना डॉ. सावंत यांनी बैठकीत दिल्या. संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचे याव्यात, त्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते योग्य उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नवीन वर्षाचे आगमन होणार असल्यामुळे त्याचे स्वागत करण्यासाठी नागरिक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळी जातात. मात्र नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी कोविड अनुरूप नियमांचे पालन करणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. जोखमीच्या रुग्णांनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहनही मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे.

नववर्षाच्या पर्शवभूमीवर विषाणू संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता पुढील १० ते १५ दिवस आरोग्य यंत्रणेने आणि नागरिकांनी सतर्क रहावे. टास्क फोर्सकडून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक उपाययोजना सूचविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. गंगाखेडकर यांनी यावेळी सांगितले की, जेएन-१ या कोरोनाच्या उपप्रकारामुळे मोठा धोका निर्माण होईल अशी परिस्थिती सध्या नाही. मात्र तरीही वयोवृद्ध नागरिक आणि गंभीर आजाराच्या रुग्णांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असून लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. उपचारामध्ये एकसमानता राखण्यासाठी औषध नियमावली, तसेच आवश्यक ती मार्गदर्शक नियमावली लवकरच टास्क फोर्सकडून सादर केली जाईल.

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. वर्षा पोतदार, डॉ. डी. बी. कदम या टास्क फोर्सच्या सदस्यांनीही बैठकीत आपले मत व्यक्त केले. बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि आरोग्य विभागाच्या तयारी संदर्भात सादरीकरण केले.

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, तसेच टास्क फोर्सचे सदस्य नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते, पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेतील (एनआयव्ही) डॉ. वर्षा पोतदार, नवले वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. डी. बी. कदम, आरोग्य विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी या बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Previous Post

Talathi Recruitment Results : 8 लाख उमेदवार तलाठी भरती परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत; निकाल ‘या’ महिन्यात लागणार

Next Post

Yerawada Prisoner Murder : येरवडा कारागृह हादरले ! कारागृहात कैद्याची हत्या, कारागृह पोलिसावर गुन्हा दाखल करेपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, ससूनमध्ये नातेवाईकांचा ठिय्या

Next Post
Yerawada Prisoner Murder : येरवडा कारागृह हादरले ! कारागृहात कैद्याची हत्या, कारागृह पोलिसावर गुन्हा दाखल करेपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, ससूनमध्ये नातेवाईकांचा ठिय्या

Yerawada Prisoner Murder : येरवडा कारागृह हादरले ! कारागृहात कैद्याची हत्या, कारागृह पोलिसावर गुन्हा दाखल करेपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, ससूनमध्ये नातेवाईकांचा ठिय्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Qatar News : ‘त्या’ 8 माजी भारतीय नौसैनिकांना फाशीच्या शिक्षेपासून कसे वाचवू शकते भारत सरकार, जाणून घ्या नेमके प्रकरण

Qatar News : ‘त्या’ 8 माजी भारतीय नौसैनिकांना फाशीच्या शिक्षेपासून कसे वाचवू शकते भारत सरकार, जाणून घ्या नेमके प्रकरण

2 years ago
Makar Sankranti 2023 : संक्रांत आणि किंक्रांत नेमका काय आहे फरक ? वाचा सविस्तर माहिती

Makar Sankranti 2023 : संक्रांत आणि किंक्रांत नेमका काय आहे फरक ? वाचा सविस्तर माहिती

1 year ago
भारतीय निवडणूक आयोग अभिनेता राजकुमार रावची नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करणार

भारतीय निवडणूक आयोग अभिनेता राजकुमार रावची नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करणार

2 years ago
Ayodhya : प्रभू श्रीरामांच्या लोभस मूर्तीची पहिली झलक पाहिलीत का ? शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली तेजस्वी मूर्ती

Ayodhya : प्रभू श्रीरामांच्या लोभस मूर्तीची पहिली झलक पाहिलीत का ? शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली तेजस्वी मूर्ती

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.