बिहार : बिहारमधील मोतीहार या गावांमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. नवविवाहितेला हुंड्यासाठी त्रास देणाऱ्या सासरकडच्यांनी तिची निर्दयीपणे हत्या केली. आणि कोणाला या गोष्टीचा सुगावा लागण्याआधीच स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेले. पण त्या ठिकाणी तिचे आई-वडील पोहोचले आणि त्यांना पाहताच सासरकडच्यांनी पळ काढला.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बिहार मधील मोतीहारमध्ये फुल परीदेवी वय वर्ष 20 हिचे लग्न तिच्या आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने लावून दिले होते. ८ मार्च 2023 रोजी टोला गावातील सुभाष शर्मा यांचा मुलगा नितेश कुमार याच्याशी फुल परिचय लग्न लावून देण्यात आले होते.मात्र हुंड्याच्या लालसे पोटी सासर कडच्यांनी तिची हत्या केली.
पाच लाख रुपये रोख आणि दुचाकीसाठी तिचा सासरी छळ सुरू होता लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केली आणि माहेरी परत पाठवून दिले होते त्यानंतर काही वेळाने पुन्हा तो त्याच्या पत्नीला सासरी घेऊन गेला होता तिच्यावर अत्याचार सुरूच होते तर अचानक तिच्या मृत्यूची बातमी तिच्या आई-वडिलांना समजली
विलंब न करता तिच्या आई-वडिलांनी थेट स्मशान भूमीकडे धाव घेतली आणि सासरकडच्यांनी तिच्या आई-वडिलांना पाहता क्षणी तिथून पळ काढला. दरम्यान आई-वडिलांनी तिचा अर्धवट जळालेला मृतदेह चितेवरून खाली उतरवला. या घटनेची माहिती पोलिसांना समजतात पोलीस आणि घटनास्थळी धाव घेतली. यावेळी फुल परी यांची आई यांनी मुलीला गळा आवळून तिची हत्या केली असल्याचा आरोप सासरकडच्यांवर केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली असून मुलीच्या आईच्या तक्रारीवरून या महिलेचा पती सासू सासरे यांच्यासह घरातील अनेकांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे.