पुणे : पुण्यातील एका १९ वर्षीय तरूणाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde आणि खासदार श्रीकांत शिंदे MP Shrikant Shinde यांच्याबद्दल धमकीची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. याबाबत मुंबई पोलिसांना माहिती मिळताच तपास करून अखेर या तरूणाला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. आरोपीला मुंबईला नेण्यात येत असून त्यानंतर सखोल चौकशी करून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे समजते.
नेमकं प्रकरण काय ?
गुंड कसे बनायचे? या विषयावर एक पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आली होती. या पोस्टला कमेंट या १९ वर्षीय तरूणाने केली होती. या पोस्टमध्ये त्याने म्हटले होते की, ” ज्याचे लक्ष्य मुख्यमंत्री असेल, त्याला मी बंदुक द्यायला तयार आहे.” ही पोस्ट एका यूजने पाहिल्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याबाबत खातरजमा केल्यानंतर या तरूणाची माहिती मिळवली असता तो पुण्यातला असल्याचे समजले.
यानंतर मुंबई पोलिसांनी पुण्यात येऊन या तरूणाला ताब्यात घेतले आहे. आरोपीला मुंबईला आणल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती मिळते आहे.
PUNE ACCIDENT : पुणेकर म्हणतात नकोच ‘त्या’ पुलावरून प्रवास ! नवले पुलाखाली पुन्हा विचित्र अपघात; 10 वाहने एकामेकांना धडकली
कोण आहे हा तरुण ?
पुण्यात राहणारा हा १९ वर्षीय आरोपी संगणक क्षेत्रातील पदवीधर आहे. त्याने कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये शिक्षण घेतले आहे. तो मूळचा नांदेडचा रहिवासी असून सध्या पुण्यात राहतो. त्याने अशी बेदरकार कमेंट का केली याची चौकशी आता मुंबई पोलीस करत आहेत .