पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून एक मोठी बातमी समोर येते आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गट विभाग प्रमुख विजय थोरी यांच्या मुलाची जबर मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून हि हत्या करण्यात आली असल्याचे समजते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख विजय थोरी यांचा मुलगा विशाल थोरी वय वर्ष 23 हा मध्य धुंद अवस्थेत होता. यावेळी त्याचे काही जणांशी वाद झाले. आरोपी हे त्यांचे कपड्याचे दुकान बंद करत होते यावेळी काही कारणाने त्यांच्यात वाद झाला होता.
त्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास आरोपी आणि विशाल थोरी हे एकमेकांसमोर आले. यावेळी आरोपींनी विशाल यांच्यावर सिमेंटचे गट्टू, लाकडी बांबूने जबर मारहाण केली. ही मारहाण एवढी भीषण होती की विशाल याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे.