ठाणे : ठाण्याच्या कासारवडवली गावातून तिहेरी हत्याकांडाची Murder धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आठ वर्षांपूर्वी त्या दांपत्याचा संसार सुरू झाला होता. दोघांना अंकुश आणि खुशी नावाची दोन चिमुकली देखील होती. पण या सुखी चौकोनी कुटुंबात विष कालवल गेलं ते दारूच्या व्यसनाने…
आरोपी पती अमित याला प्रचंड दारूचे व्यसन लागलं होतं. यातूनच पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडण होत होती. सततच्या भांडणांना वैतागून पत्नी भावना दोन्हीही मुलांना घेऊन कासारवडवली या गावात आपला दीर विकास याच्यासोबत राहत होती. दरम्यान पती-पत्नीमध्ये वाद सुरू असले तरी अमित सातत्याने आपल्या पत्नीला पुन्हा संसार सुरू करण्यासाठी विनवणी करत होता. पण हताश झालेली पत्नी परत यायला तयार नव्हती.
दरम्यान 13 डिसेंबरला मुलाच्या वाढदिवसासाठी अमित कासारवडवली येथे आला होता. आणि सर्वजण एकत्र राहत होते. दरम्यान दीर विकास हा नेहमीप्रमाणे सकाळी 21 डिसेंबरला कामासाठी बाहेर पडला आणि त्यानंतर आरोपी अमित याने क्रिकेटच्या बॅटने पत्नीवर हल्ला करून तिची निर्दयीपणे हत्या केली. एवढ्यावरच हा क्रूर पती आणि पिता थांबला नाही. त्याने आपल्या दोन्ही लहान मुलांचा देखील जीव घेतला. त्यानंतर आरोपी अमित हा फरार झाला होता. दरम्यान पोलिसांनी कौशल्याने तपास करून आरोपी अमित याला हरियाणातील हिसार रेल्वे स्टेशन वरून ताब्यात घेतले आहे.