जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. भाजपने आपली पहिली यादी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचं नाव नसलं तरी महाराष्ट्रातील घोडदौड आता वेगाने सुरू झाली आहे. आज केंद्रीय मंत्री अमित शहा AMIT SHAHA यांचा जळगाव दौरा आहे. यावेळी त्यांनी जळगावमध्ये जोरदार भाषण केले आहे.
आजच्या या भाषणामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी, शरद पवार, घराणेशाही यांवर टीका केली आहे.
भाषण करताना अमित शहा म्हणाले की, ” 2024 च्या निवडणुकीच्या बाबतीत बोलण्यासाठी मी आलो आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी मतदान आहे या गैरसमज्यात राहू नका. 2017 ला विकसित भारत बनवण्यासाठी हे मतदान आहे. भविष्यासाठी मतदान आहे. युवकांच्या भविष्यासाठी हे मतदान आहे. ” असे यावेळी अमित शहा म्हणाले आहेत.
https://www.facebook.com/share/v/WjSykeFe6qPTEtyX/?mibextid=qi2Omg
उद्धव ठाकरे, राहुल गांधींवर टीका
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अमित शहा यांनी घराणे शाहीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, ” इंडिया आघाडीतले सर्व पक्ष घराणेशाही मानणारे आहेत. जे पक्ष आपल्या पार्टीत लोकशाही नाही तर परिवारवादाच्या पार्टीत आहेत. त्या देशात ते लोकशाही ठेवू शकतील का ? असा सवाल त्यांनी केला. तसेच उद्धव ठाकरेंना आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचे आणि शरद पवारांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचे. त्यांना त्यांच्या मुला मुलींना मुख्यमंत्री बनवायचं तुमच्यासाठी काही नाही, तुमच्यासाठी फक्त मोदी आहेत ! असं देखील यावेळी अमित शहा म्हणाले आहेत.
अरे बापरे ! 22 आमदार शरद पवारांकडे घर वापसी करणार ? नेमकं काय म्हणाले रोहित पवार, वाचा सविस्तर