दिल्ली : दिल्लीतील साकेत न्यायालयाने पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातील Soumya Viswanathan Murder Case चारही आरोपींना जन्मठेपेची Life imprisonment शिक्षा सुनावली आहे. रवी कपूर, अमित शुक्ला, बलबीर मलिक आणि अजय कुमार यांना या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने चार आरोपींना दंडही ठोठावला असून सर्व दोषींना मकोका अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नेमके काय होते प्रकरण !
दिल्लीतील महिला टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन यांची 30 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीतील नेल्सन मंडेला मार्गावर हत्या करण्यात आली होती. सौम्या नाईट शिफ्ट करून ऑफिसमधून घरी जात होती. पोलिसांना सौम्याचा मृतदेह तिच्या कारमध्ये सापडला होता. पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यासाठी 6 महिने लागले.
साकेत न्यायालयाने चार आरोपी रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत सिंग मलिक आणि अजय कुमार यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत सौम्याच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले, तर पाचवा आरोपी अजय सेठी हत्येप्रकरणी दोषी आढळला नाही, परंतु त्याच्याकडे लुटलेला माल होता. त्यामुळे अजय सेठीला कलम 411 अन्वये दोषी ठरवण्यात आले.दिल्लीच्या साकेत कोर्टाने शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता. चारही आरोपींना दोन प्रकरणात स्वतंत्रपणे जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हे वाचलेत का ? धक्कादायक ! बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डात CBI चौकशी दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने नेमकं का उचललं टोकाचं पाऊल ! वाचा सविस्तर प्रकरण