संगमनेर शहरातील जेलचे गज कापून पुन्हा बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपी पसार झाल्याची घटना उघडकीस आली असून बुधवारी पहाटेच्या साडेचार पाचच्या सुमारास घडली आहे. यात लैंगिक अत्याचारामधील आरोपी रोशन थापा ददेल, अनिल ढोले, खुन प्रकरणातील राहुल देविदास काळे आणि मच्छिंद्र जाधव अशी पसार झालेल्या आरोपींची नावे आहेत. सुरक्षेसाठी देण्यात असलेले पोलीस झोपेत असतानाच पहाटेच्या सुमारास आरोपींनी हा डाव साधला.
आरोपींनी गज कापून पलायन केले असून यामुळे संगमनेर शहर हादरून गेले आहे. पळून गेलेले आरोपी हे कुख्यात आरोपी असून या आरोपींनी प्लॅनिंग करून पळून जाण्याचा डाव साधला असल्याची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे कारण या ठिकाणी त्यांच्यासोबत इतर आरोपी असताना आणि जेलमध्ये अधिकारी कर्मचारी असताना गज कापून पलायन करणे म्हणजे सोपी गोष्ट नसूनही ही गोष्ट या आरोपींनी साध्य केली म्हणजेच कुठेतरी मोठे प्लॅनिंग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आता विविध ठिकाणी पथके पाठवले असून आरोपी लवकरच पुन्हा जेरबंद होतील अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.