पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस चौकीच्या हद्दीतील आकाश माने आणि त्याची पत्नी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश माने यांच्याकडून वडिलांच्या आजारपणासाठी तीस हजार घेतले होते. परंतु ती उसने घेतलेले पैसे परत करू न शकल्याने तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय या दाम्पत्याने करून घेतला.
या धक्कादायक घटनेने पुणे जिल्हा एकदा हादरला आहे. यातील अल्पवयीन मुलगी ही अवघ्या सतरा वर्षाची आहे. तिच्या वडिलांच्या आजारपणासाठी तिने तीस हजार रुपये उसने घेतले होते. हे 30 हजार रुपये परत करू न शकल्यामुळे फिर्यादीने लॉजवर नेऊन पंधरा दिवस तिला डांबून ठेवले आणि तिच्यावर अत्याचार केला. एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही तर त्याने उसने पैसे परत घेण्यासाठी तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला आणि परत पैसे कमावले. या प्रकरणी आता माने दांपत्यावर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.